*⚡कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्ट यांच्यावतीने दशक्रोशीतील नागरीकांसाठी त्वचा रोग , गुप्त रोग , कुष्ठरोग या वर रुग्णांची मोफत तपासणी शिबिर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते .या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.तालूका भरातून रुग्णांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला आहे.
सदर शिबिरासाठी डॉ . शिशिर खोसे पाटील हे तज्ञ डॉ लाभले होते .ते ससून हॉस्पिटल पुणे येथून एमडी पदवी प्राप्त असून केंद्र शासनाची त्वचारोग तज्ज्ञ पदवी पूर्ण झालेली आहे.त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका येथे नियुक्ती झाली आहे.
यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,उपसरपंच निरज मोरये, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, शिबिरासाठी डॉ . शिशिर खोसे पाटील, नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे , डॉ दिक्षा वाळके,मोरजकर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष भाई मोरये , नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, कमलेश पाटील,राजू तांबे, तुकाराम तुप्पट, पप्पी सापळे,एकनाथ मोरये तसेच आरोग्य सहाय्यक ठाणेकर , आरोग्य सेवक आर .के.चव्हाण, आरोग्य सेविका पवार , मुसळे , आशा गटप्रवर्तक सोनाली शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.शिशिर खोसे पाटील बोलताना म्हणाले, माझी इच्छा होती की सिंधुदुर्गातील जनतेची सेवा करावी .ती आज शिबिराच्या माध्यमातून पूर्ण झालेली असून दर मंगळवारी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात या संबंधित रुग्णांची तपासणी होणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी डॉ.शिशिर खोसे पाटील, नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांचा शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम प्रास्ताविक ऋषिकेश मोरजकर,तर आभार भाई मोरजकर यांनी मानले.
