वेध नगरपालिका निवडणुकीचे

भाजपात जुन्यासह नवीन इच्छूक;माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात गर्दी होण्यास सुरुवात

*⚡सावंतवाडी ता.२७ प्रसन्न गोंदावळे-:*   सावंतवाडी नगरपालिका निवडणूक आगामी काळात होणार असून, भाजप मध्ये माजी नगरसेवकांसह अनेक नवीन चेहरे देखील इच्छुक आहेत. सावंतवाडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सगळ्यांनीच माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात गर्दी केली आहे. 

जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर, आता उर्वरित तिन नगरपालिकांसाठी पदाधिकारी सज्ज झाले असून, सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.  
सावंतवाडीत भाजपमध्ये माजी नगरसेवकांसह अनेक नवीन युवा चेहरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी आता पासूनच तशी तयारी सुरू केली आहे. सावंतवाडीची नगरपालिका भाजपला पुन्हा एकदा ताब्यात घ्यायची असल्याने, भाजपकडून चाचपणी करूनच उमेदवार दिले जाणार आहेत. तसेच वरिष्ठ नेत्याकडून ही नगरपालिका काबीज करण्यासाठी रणंनिती देखील आखली जात आहे. तसेच  दोन वर्षापूर्वी सावंतवाडी नगरपालिकेची हातातून गेलेली सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्याकडून देखील गुप्त रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 
परंतु, दोन्ही पक्षांनी कितीही तयारी केली तरी देखील सावंतवाडीची जनता कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

You cannot copy content of this page