Headlines

ग्लोबल रक्तदाते समूहाकडून जिल्हा रक्तपेढील आवश्यक साहित्य भेट

*⚡मालवण ता.२२-: ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र चौथ्या वर्धापनदिना निमित्त ग्लोबल रक्तदाते मालवण परिवाराकडून ओरोस जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी मध्ये आवश्यक वजन काटे उपलब्ध करून खराब झालेला ब्लड डोनर कोच सुस्थितीत आणून रक्तपेढीला सुपूर्द करण्यात आला. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीमध्ये ब्लड डोनेशनच्या वेळी आवश्यक असणाऱ्या वजनकाट्यांची कमतरता होती व ब्लड डोनेशन बेड हे पूर्णतः खराब अवस्थेत असल्याचे रुग्णसेवक श्री.राजेश पारधी यांनी अमेय देसाई यांना याची कल्पना देऊन या साठी मदतकार्य करण्याचे सुचवले होते. त्याप्रमाणे ग्लोबल रक्तदाते समूह संघटक परिवारातर्फे अति आवश्यक पाच वजन काटे उपलब्ध केले. ब्लड डोनेशन कोचचे रेक्झिनचे काम कट्टा येथील कारागीर म्हणून श्री. नितीन चव्हाण व त्यांचे मित्र यांना ओरोस ब्लडबँक मध्ये सोबत घेऊन काम पूर्ण करण्यात आले.

वजन काटे व सुस्थितीत केलेला ब्लड डोनर कोच सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, आरोग्य सेवक किशोर नांदगावकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ग्लोबल रक्तदाते समूहाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा रक्तपेढीला हे अत्यावश्यक साहित्य देण्यात आले. देऊन. यावेळी ग्लोबल रक्तदाते परिवाराच्या वर्धापन दिनाच्या रक्तपेढी तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या व दिलेल्या साहित्य दिल्याबद्दल आभार मान्यात आले.

तसेच रक्तदान बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्लोबल रक्तदाते समिती संघाटक राजा शंकरदास, अमेय देसाई, राजेश पारधी, विकास पांचाळ, दिपक ढोलम, राकेश दर्गे आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी राजा शंकरदास , राजेंद्र बिडये, अमेय देसाई, विजय पांचाळ, विकास पांचाळ, राकेश डगरे, दीपक ढोलम, नेहा कोळंबकर, राधा केरकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page