छ.शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरबाबत मराठा समाजाची भूमिअभिलेखला भेट

पुतळा स्थलांतरबाबत कार्यवाहीची केली मागणी

*⚡कणकवली ता.२१-:कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी पुतळा स्थलांतर लवकरात लवकर व्हावे, यासाठी तालुका सकल मराठा समाज नेहमीच पाठपुरावा करत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मराठा समाज कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कणकवली भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रभारी उपअधिक्षक सुनील परब यांची भेट घेतली. प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची जमीन मोजणी झाल्यानंतर पुढील कारवाई काय झाली? याबाबत माहिती घेतली. त्यावर भुमिअभिलेख उपअधीक्षक सुनील परब यांनी सदर प्लॉट सरासरी वीस गुंठे क्षेत्र भरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तातडीची मोजणी आम्ही केली.

पालकमंत्री उदय सामंत यांनी सदर प्लॉट मोजणी करत शिवाजी महाराज स्मारक व स्टॉल धारकांसाठी जागेच्या उपलब्धतेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार अधिकृत मोजणी केली असून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल कणकवली तहसील कार्यालयात येत्या दोन दिवसांत सादर करणार असल्याचे सकल मराठा समाज कार्यकर्त्यांना श्री. परब यांनी सांगितले. त्यावेळी मराठा समाज कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी,मुळातच महाराजांच्या पुतळा स्थलांतराला भरपूर वेळ गेलेला आहे. त्यामुळे आम्ही हा पाठपुरावा करत असल्याचे अध्यक्ष भाई परब यांनी सांगितले. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष भाई परब,महेंद्र सांब्रेकर, सुशील सावंत, बच्चू प्रभुगावकर, सुशांत दळवी,बबलू सावंत,शेखर राणे यांच्यासह सकल मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page