*⚡सावंतवाडी ता.२१-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना तेजस्विनी हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून ओटवणे येथे श्री रवळनाथ वाचनालयात शनिवारी २२ व २३ जानेवारीला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत संपूर्ण शारीरिक तपासणी अॅक्यूप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अनेकदा आपल्याला कोणता आजार आहे हे कळत नाही किंव्हा आजाराची लक्षणे समजत नाही. अशावेळी आरोग्य तपासणी करून योग्य ते उपचार सुरू ठेवल्यास आजार बरा होतो. मात्र वेळीच तपासणी न केल्यामुळे होणाऱ्या गंभीर आजाराचा खर्च सर्व सामान्यांना परवडणारा नसतो. परंतु वेळीच तपासणी करून दिसणाऱ्या आजाराच्या पहिल्या टप्प्यातच उपचार करून या आजारावर कमी खर्चात मात करु शकतो. याच उद्देशाने मनसेने संपूर्ण शारीरिक तपासणी ऍक्यु प्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराचे ओटवणे येथे आयोजन केले आहे. या शिबिराचा ओटवणे दशक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन मनसे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, प्रभाकर गावकर, संतोष सावंत यांनी केले आहे.
