माजी नगरसेवक आनंद नेवगी यांच्या सहकार्यातून आयोजन
सावंतवाडी ता.२१-: रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने ५० व्या वर्षानिमित्त भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिना दिवशी चिटणीस नाका येथील बापूसाहेब पुतळ्या कडे सकाळी ७ वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन असून, रोटरी क्लब आणि सावंतवाडी तालुका व्यापारी महासंघ उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद नेवगी यांच्या सहकार्याने फिजीओथेरपी मोफत पूर्वतपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी ट्रस्ट फिजीओथेरपी सेंटर येथे शारीरिक व्याधीवर फिजीओथेरपी मोफत पूर्वतपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात मानदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, जुनी सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी टेनिस एल्बो, स्नायूदुखी, लचकदुखी, फ्रॅक्चर, पॅरालिसीस, स्पाॅडीलिसीस या आजारांवर मोफत पूर्व तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी रुकाया शेंडेवाले ( खान) ( Bpth, MPT) , अपूर्वा वाडीकर ( Bpth, MPT) हे दोन ऑर्थोतज्ञ मार्गदर्शन करून पूर्वतपासणी करणार आहेत. हे शिबिर खासकीलवाडा येथे साधले मेस समोर, रोटरी ट्रस्ट फिजीओथेरपी सेंटर येथे सकाळी ९:३० ते दुपारी २:३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून, ८०५०५२६४२४, ८००७५३७३७० या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क करण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार, सचिव सी.ए. सुधीर नाईक, आनंद रासम यांनी केले आहे
