*⚡वेंगुर्ला ता.२१-:* वेंगुर्ल्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत महिला प्रसुती विभागासाठी शासनाचा कायमस्वरूपी महिला डॉ. माने-पवार मिळाल्याने या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटखाली नार्मल डिलिव्हरी झाली. याबद्दल वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्च्याच्यावतीने प्रसुती तज्ज्ञ डॉ. स्वप्नाली पवार यांचे खास अभिनंदन करण्यात आले.
पूर्वाश्रमीचे वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय व आत्ताचे उपजिल्हा रुग्णालयात गेल्या काही कालावधीपासून महिला प्रसुती तज्ज्ञ नसल्याने प्रसुती विभागच बंद स्थितीत होता. परंतु, दोन महिन्यापूर्वी महिला डॉक्टर स्वप्नाली माने-पवार यांची शासनाने उस्मानाबाद येथून बदली करून वेंगुर्ला येथे नेमणूक केल्यामुळे गरोदर महीलांची तपासणी सुरू झाली. गेल्या काही कालावधीनंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या नुतन इमारतीत प्रथमच वेंगुर्ल्यात प्रसुती विभाग हा महिला तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीने सुरू झाला व त्यामुळे गोरगरीब महिलांची अडचण दुर झाली. डॉ.माने-पवार यांनी ३ जानेवारी रोजी एका गरोदर महीलेची नॉर्मल प्रसुती केली व वेंगुर्ला रुग्णालयातील प्रसुती विभाग पुन्हा एकदा सुरु केल्याबद्दल भाजपा महिला मोर्चाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, माजी नगराध्यक्षा डॉ.पूजा कर्पे, माजी नगरसेविका श्रेया मयेकर, कृपा गिरप, रसीका मठकर आदी उपस्थित होत्या.
