*⚡वेंगुर्ला ता.२१-:* तळागळातील व्यक्तींना कायद्याची ओळख व्हावी व माहिती मिळावी या उद्देशाने आणि उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग-ओरोस यांचे निर्देशानुसार वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती व वेंगुर्ला तालुका बार असोसिएशन यांच्यावतीने १९ ते २१ फेब्रुवारी कालावधीत तालुक्यात जनजागृतीपर कायदे विषयक मार्गदर्शन शिबिराचे व मोबाईल व्हॅन सोबत लोक अदालतीचे आयोजन केले आहे.
या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत दाभोली ग्रामपंचायत कार्यालय येथे अॅड. एस. आर. ओगले हे ‘वरिष्ठ नागरिकांचे अधिकार व कायदे‘ यावर मार्गदर्शन, तर दि. २१ रोजी वायंगणी ग्रामपंचायत येथे सकाळी ११ ते १२ या वेळेत अॅड. एस.पी.बावीस्कर या ‘स्त्रियांचे अधिकार व कायदे व व्हीकटीम काँम्पेनशेषन स्कीम‘ यावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दि. २० रोजी उभादांडा ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११ वा. मोबाईल व्हॅन लोक अदालतीचे आयोजन केले आहे. उभादांडा गावातील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून तडजोडीने मिटवावीत व मोबाईल लोक अदालतीचा लाभ घ्यावा. तसेच दाभोली व वायंगणी येथील ग्रामस्थांनी जनजागृतीपर शिबिराला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश के.के. पाटील व वेंगुर्ला तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. जी.जी.टांककर यांनी केले आहे.
