इच्छा मरणाची परवानगी द्या

एसटी कर्मचाऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र

*⚡मालवण ता.११-: राज्य शासनात एस टी चे विलनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी यांचा संघर्ष सुरू आहे. शासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत मालवण आगारातील एसटी कर्मचारी यांनी स्वेच्छा मरणाच्या परवानगी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत राज्यपालाना ही पाठविण्यात आली आहे.

मालवण आगारातील एस टी कर्मचाऱ्यांच्यावतीने आज मंगळवारी एस टी चे कर्मचारी काका खोत, हेमंत तळवडकेकर, दीपक ढोलम, स्वप्नील शिंदे, महेंद्र करगुटकर,संदीप परब,परशुराम पवार , नितीन चव्हाण,सखाराम मालवणकर, महेश परब देविदास प्रभुखोत , उत्तम हडकर, सचिन साळकर , बाबा डीचोलकर आदीच्या शिष्टमंडळाने मालवण तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार जी एम कोकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या निवेदन पत्रावर मालवण आगारातील सुमारे दीडशे कर्मचारी यांच्या स्वाक्षरी आहेत. मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदानिहाय वेतनश्रेणी देऊन आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे. आम्हा एसटी कर्मचारी यांना जीवदान द्यावे. अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी. अशी मागणी कर्मचारी यांनी निवेदन पत्रातून केली आहे.

You cannot copy content of this page