दोडामार्ग / सुमित दळवी तेरवण मेढे येथील बीएसएनल मोबाईल टॉवर १५ दिवसांपासून बंद होता,मात्र युवा सेना कार्यकर्ते संदेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेताच अखेर बंद असलेला बीएसएनल टॉवर सुरळीत केला आहे.
संदेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेला शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी व रामदास मेस्त्री यांनी पाठिंबा देत संबंधित अधिकाऱ्यांला सेना स्टाईल दाखवली आहे.तात्काळ कार्यवाही करून आज सायंकाळपासून तो बीएसएनल मोबाईल टॉवर सुरू झाल्याची माहिती संदेश राणे यांनी दिलीआहे.
