Headlines

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागतर्फे हनुमंत गड संवर्धन मोहीम..

*💫सावंतवाडी दि.०१-:* दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील हनुमंत गडावर सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने गड संवर्धन मोहीम राबविण्यात आली.ही मोहीम राबविताना गडावर चढण्याआधी फुकेरी गावची ग्रामदेवता श्री वैज माऊली देवीला प्रतिष्ठानतर्फे श्रीफळ ठेऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच तेथील मानकऱ्यांनी गाऱ्हाणे दिल्यावर मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी गडावरील दिंडी दरवाजा जवळील तटबंदीच्या बाजुला वाढलेली झाडी तोडून तटबंदी मोकळी करण्यात आली. तसेच गडावर प्रतिष्ठानतर्फे दिशादर्शक फलक लावण्यात आले. मुख्य दरवाजावर मोठ्या प्रमाणात वाढलेले गवतही काढण्यात आले. ही मोहिम सलग दोन दिवस राबविण्यात आली. मोहिमेत सर्वांना काम वाटून देण्यात आली होती. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागाचे दुर्गसेवक, दुर्गसेविका, इतर प्रतिष्ठानचे दुर्गसेवक, फुकेरी गावातील शिवप्रेमी या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत अश्विनी ताई यांनी रोहन पुळासकर (सावंत) यांच्या वाढदिवसानिमित्त दोन टिकाव, एक फावडे, तुषार रेडकर यांच्याकडून फावडे, अर्जुन अजिंक्य अहिरे यांच्याकडून दोन पारई, प्रमोद मगर यांच्याकडून पत्नी प्राचीताई प्रमोद मगर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मेजर टेप, नितीश ऋषिनाथ पत्याणे यांच्याकडून एक कप्पी, एक चिन्नी हातोडा, एक छोटी कुऱ्हाड, रणजित देसाई यांच्याकडून वडिलांच्या स्मरणार्थ दोरी बंडल, अमित कदम यांच्याकडून एक चैन ब्लॉक, ह्युमन राईट्सचे सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांच्या कडून जनरेटर भांड, रामचंद्र आईर यांच्या कडून जेवणाच सामान देण्यात आले. या सर्वांचे सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या सर्व दुर्गसेवक व रणरागिणींनी आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page