अज्ञात चोरट्याने मॉर्निंग वॉक ला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळविले

अज्ञात चोरट्या विरूद्ध पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

सावंतवाडी-: माजजगाव दत्त मंदिर येथे एका अज्ञात चोरट्याने एका महिलेचे मंगळसूत्र त्या महिलेच्या गळ्यातून खेचून नेले असल्याची घटना आज पहाटे घडली आहे. सौ. कांचन अनिल शिरसाट ( वय ४५) ही महिला आज पहाटे मॉर्निंग वॉक ला गेली असता मागून धावत येणाऱ्या अज्ञात इसमाने गळ्यातील मंगळसूत्र खेचून तेथून पळ काढला आहे. याबाबतची तक्रार पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली असून, अज्ञात गुन्हेगारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,अधिक तपास पोलिस करत आहेत.

You cannot copy content of this page