*💫सावंतवाडी दि.०१ -:* येथील झीरंग येथे एका बेकरी कामगाराने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. त्याने राहत असलेल्या बिल्डिंग च्या टेरेसवर मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या युवकाचे नाव प्रेजील (२२ वर्ष) असे असून, हा युवक मुळचा केरळ येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षभरापासून तो शहरातील गणेश बेकरी च्या फॅक्टरी काम करत होता. काल इतर कामगारां सोबत आपल्या खोलीत झोपायला गेल्या नंतर त्याने रात्री टेरेस वर जाऊन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे. याबाबतची फिर्याद राज पांडे यांनी पोलिसात दिली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सतिश देसाई करत आहेत
