*शिवसैनिकांचा जल्लोष
*💫वेंगुर्ला दि.३१-:* वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधून समृद्धी कुडव यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या एका जागेने शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणूकीत तालुक्यात आपले खाते खोलले आहे. त्यांच्या या निवडीने शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. वेंगुर्ला तालुक्यातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यासाठी दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांसाठी एकूण ५५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सागरतीर्थ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण गटातून महिला समृद्धी संतोष कुडव यांची बिनविरोध निवड झाली. कुडव या शिवसेनेच्या महिला शाखा संघटीका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन करताना शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपतालुकाप्रमुख सुधाकर राणे, विभागप्रमुख काशिनाथ नार्वेकर, बाळा कुडव, सुवर्णा राणे, कृष्णा सावंत, शेखर कुडव, नेहा तांडेल, नरेंद्र मोंडकर, प्रसाद आरेकर, श्रीकांत घाटे, संतोष कुडव, बाळा पेडणेकर, भाग्यश्री कांबळी, अवधूत चिचकर, गिरीश राणे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
