दशावतारी नाटक सादर करून शिक्षकांच्या सहकार्यातून उभारला निधी..
*⚡वेंगुर्ले ता.०८-: शिक्षक कलामंच,वेंगुर्ले मार्फत आज साईमंगल कार्यालय वेंगुर्ले येथे जि. प. सिंधुदुर्ग चे उपशिक्षणाधिकारी श्री रामचंद्र आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड19 मुळे पालकांचे छत्र गमावलेल्या तालुक्यातील मुलांना आर्थिक मदतीचा हातभार लावण्याचा समारंभ करून शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपली.
वेंगुर्ले तालुक्यातील शिक्षकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत कोविड19 मुळे अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीसाठी “भोमासुर वध अर्थात नरकचतुर्दशी महिमा” हा दशावतारी नाट्यप्रयोग दि.३० ऑक्टोंबर २०२१ रोजी सादर केला. या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तालुक्यातील शिक्षक आणि नागरिकांना कोविड19 मध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीचे आवाहन केले होते,
त्या आवाहनाला तालुक्यातील शिक्षक कलामंच चे सभासद ज्यात कार्याध्यक्ष श्री कांडरकर, सचिव श्री खानोलकर आणि सभासद श्री सीताराम नाईक, संतोष परब, एकनाथ जानकर, सीताराम लांबर, झिलू घाडी, भाऊ आजगावकर, प्रसाद जाधव, कर्पुरगौर जाधव, राजू वजराटकर आदींनी हातभार लावला तसेच जाणकार नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यातून भरगोस असा निधी उभा राहीला. त्या निधीतून आज 3 मुलांना यावेळी प्रत्येकी 35000 रकमेचे चे किसान विकास पत्र, शालेय दप्तर, लागणारे साहित्य आणि प्रवासखर्च प्रदान करण्याचा कार्यक्रम बहुसंख्य शिक्षक, पालक तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत साधे पणाने पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी गटशिक्षणाधिकारी श्री रमेश पिंगुळकर, माजी सभापती श्री जयप्रकाश चमणकर, माजी गटविकास अधिकारी श्री बाबली वायंगणकर, जे जे स्कुल ऑफ आर्ट्स चे माजी प्राध्यापक श्री सुनील नांदोसकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री विश्वनाथ कांबळी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री सत्यवान पेडणेकर, माजी गटसमन्वयक श्री भरत आवळे आदि मान्यवरांसहित पालक, शिक्षक, पत्रकार उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वेंगुर्ले शिक्षक मंच च्या सर्व सभासदांनी मोलाचा वाटा उचलला. या मदतनिधी ची संकल्पना ज्यांनी प्रथम मांडली ते श्री सीताराम नाईक सर आणि त्यांच्या सोबत साथ देणाऱ्या सर्व वेंगुर्ले शिक्षक कलामंच च्या सर्व सभासदांचे उपस्थित मान्यवरांनी तोंड भरून कौतूक केले आणि असे सामाजाभिमुक उपक्रम राबविण्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री त्रिंबक उर्फ भाऊ आजगावकर आणि श्री कर्पुरगौर जाधव यांनी केले. तर आभार श्री कालिदास खानोलकर यांनी मानले.
