रोणापालमध्ये घराजवळ आलेल्या नागाला जीवदान

*⚡बांदा ता.०८-: रोणापाल तळेवाडी येथे काल दुपारी गौरेश भोगटे यांच्या घराच्या बाजूला आलेल्या सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. गौरेश भोगटे यांच्या आईला घराच्या बाजूला आलेला साप निदर्शनास आला.

याची कल्पना त्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर माजगाव येथील सर्पमित्र राजन निबरे यांना संपर्क साधला व त्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे भोगटे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page