खारेपाटण केंद्रशाळेची शिक्षण उपसंचालक कोल्हापूर कार्यालयाकडून शालेय तपासणी

*⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला शिक्षण उपसंचालक विभाग कोल्हापूर कार्यालयाकडून नेमणूक करण्यात आलेल्या बी. एम.कासार ( गटशिक्षणाधिकारी ,राधानगरी जि.कोल्हापूर) या समितीने सदिच्छा भेट दिली. व शाळेच्या एकूण कामकाजाची पाहणी करून शाळेच्या कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले.

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे देण्यात आलेल्या भेटी दरम्यान बी. एम. कासार यांच्या समवेत वेंगुर्ले तालुका गटशिक्षण अधिकारी संतोष गोसावी,हुमरमळा केंद्र प्रमुख जे.एम. गावित आदी प्रमुख समिती पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्र शाळा खारेपाटण नं.च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ गौरी शिंदे,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर,केंद्रशाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर,केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल आदी शाळेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने गट शिक्षण अधिकारी बी. एम. कासार यांचा शाळेच्या अध्यक्षा सौ. गौरी शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर गट शिक्षण अधिकारी संतोष गोसावी यांचा शाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिक्षण उपसंचालक कोल्हापूर कार्यालयाकडून आलेल्या या समितीने संपूर्ण शाळेची पाहणी केली. शालेय दप्तर अभिलेख तपासणी केली. याबरोबरच या समितीच्या वतीने जिल्ह्यातील एक प्राथमिक शाळा व एक माध्यमिक शाळा तसेच एखाद्या गट शिक्षण कार्यालयास व जि.प. शिक्षण विभाग कार्यालयाला भेट देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर शाळा तपासणी नियुक्त समितीकडून आलेले बी. एम. कासार यांनी यावेळी दिली.खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी या समितीचे स्वागत करून आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page