Headlines

पहिली ते आठवी शाळा उद्यापासून बंद

वाढत्या कोरोना प्रभावामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

ओरोस-:जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने अद्याप लसीकरण न झालेल्या जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा ६ जानेवारी पासून ऑफलाईन पद्धतीने बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने आज घेतला आहे. याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी बुधवारी सायंकाळी काढले आहेत. मात्र, ऑफलाईन शाळा बंद करण्यात आल्या असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने या मुलांचे अध्यापन सुरूच ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेल्या आदेशात दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा ६ जानेवारी पासून बंद करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांना दिले. त्यानुसार शेख यांनी याबाबत तात्काळ आदेश काढला. यामुळे जिल्ह्यातील आठवी पर्यंत वर्ग पुन्हा भरणार नाहीत. पुढील आदेश येईपर्यंत या शाळा बंद राहणार आहेत.

You cannot copy content of this page