नूतन युवा सेना जिल्हाधिकारी सुशांत नाईक यांची ग्वाही
*⚡कणकवली ता.०५-: युवा सेना जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी संघटनेने देवून माझ्यावर जो विश्वास टाकला आहे.तो विश्वास सहकाऱ्याना विश्वासात घेत सार्थ ठरविणार असल्याचे युवा सनेचे नूतन जिल्हाधिकारी सुशांत नाईक यांनी सांगितले. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्यावेळी त्यांच्यासमवेत समन्वयक गितेश कडू ॲड. हर्षद गावडे, राजू राठोड तालुकाध्यक्ष ललित घाडीगावकर,रोहित राणे,किरण वर्दम यांच्यासह प्रतिक्षा साटम,रुपेश आमडोस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते. युवा जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत भविष्यातील रूपरेषा मांडताना सुशांत नाईक म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सरचिटणीस वरून सरदेसाई, रुपेश कदम ,श्री.पेडणेकर ,खास. विनायक राऊत, पालकमंत्री ना.उदय सामंत,आम.दीपक केसरकर,आम वैभव नाईक यांच्यासह सर्व नेत्यांचे आणि शिवसैनिकांचे मी आभार मानतो. युवासेनेचे समन्वयक गीतेश कडू ,हर्षद गावडे, राजू राठोड, ललित घाडीगावकर अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने युवा सेना चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवेल.
युवासेनेच्या बुथ कमिट्या स्थापन केल्या जाणार असून कणकवली येथे युवासेनेची 6 जानेवारी रोजी बैठक होत असून त्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड वैभववाडी येथे बैठका घेतल्या जाणार असून पक्ष बळकटीसाठी जिल्हा दौरा केला जाणार आहे प्रत्येक जि. प. मतदार संघ निहाय पदाधिकारी नेमणुका केल्या जाणार असून युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्ष वाढवण्याचे काम केले जाणार आहे .यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच काम केले जाईल अशी ग्वाही युवासेना जिल्हाधिकारी सुशांत नाईक यांनी दिली
