जिल्हा काँग्रेस महिला आघाडी प्रमुखपदी पुन्हा एकदा साक्षी वंजारी यांची वर्णी…

*⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस महिला आघाडीप्रमुखपदी साक्षी वंजारी यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, यावेळी या पदाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाची संघटना आणखीन बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास साक्षी वंजारी यांनी व्यक्त केला आहे. ऑल इंडिया अध्यक्ष नेटा डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली आणि संध्या संवालाखे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसची कमिटी तयार करण्यात आली.

.यात जनरल सेक्रेटरी, सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य, महिला कॉंग्रेसच्या सदस्य, महाराष्ट्राचे सर्व जिल्हाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे आतापर्यंत ज्यांनी उत्तम कामगिरी केली आणि करत आहेत अशा महिलांची फेरनिवड पुन्हा एकदा करण्यात आली. यात नवीन चेहरे, नवीन पिढी यांनाही संधी देण्यात आली आहे. यात पुन्हा साक्षी वंजारी यांची वर्णी लागली आहे. साक्षी वंजारी या गेली अनेक वर्ष कॉंग्रेसमध्ये कार्यरत आहेत. पक्ष संघटनेसाठी त्यांच्या विशेष हातभार आहे. याच कामाची पोचपावती त्यांना यानिमित्ताने मिळाली आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थकी लावू, असा विश्वास साक्षी वंजारी यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page