भाजपातर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप कार्यक्रम

*⚡वेंगुर्ला ता.०५-:* भाजपाच्यावतीने ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून साई दरबार हॉल येथे मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजातील लहान व सीमांत शेतकरी, शेतमजुर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक शेतकरी, लेदर कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, रिक्षा चालक, गवंडी, लोहार, सुरक्षा कर्मी, प्लंबर, इलेक्ट्रीशन व इतर सर्व कामगार यांना श्रमिक लेबर कार्ड मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त असंघटीत कामगारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page