वेंगुर्ला प्रतिनिधी– दशावतार कलेला प्रोत्साहन देण्यासाठी वेताळ प्रतिष्ठानतर्फे तुळस येथे ८ ते १२ जानेवारी या कालावधीत सायंकाळी ७ वाजता दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.८ रोजी माऊली दशावतार मंडळ इन्सुली यांचा ‘पुण्यप्रभाव‘, दि.९ रोजी पार्सेकर दशावतार मंडळ वेंगुर्ला यांचा ‘मच्छिद्र महाकाली युद्ध‘, दि. १० रोजी नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळ मोचेमाड यांचा ‘लीला गौरी हराच्या‘, दि.११ रोजी चेंदवणकर दशावतार मंडळ (देवेंद्र नाईक) यांचा ‘वज्रशल्क‘, दि.१२ रोजी महापुरुष दशावतार मंडळ सावंतवाडी यांचा ‘हरिश्चंद्र तारामती‘ असे नाट्यप्रयोग होणार आहेत. नाट्यरसिकांनी कोरोना नियमांचे पालक करीत उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.
