Headlines

गणित संबोध परिक्षेत सिधुदुर्ग विद्यानिकेतनचे यश

*⚡वेंगुर्ला ता.०५-: सिधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेतलेल्या गणित संबोध परिक्षेत वेंगुर्ला येथील सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. या परिक्षेसाठी स्कूलमधून बसलेले २५ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला.

यामध्ये पाचवी व सहावीमधून भूषण सचिन नाईक (९२ गुण), अनिष अखिल आरोस्कर (९२), मिहिर राजेश राऊळ (९२), श्रेया युवराज मराठे (९०), प्राजक्ता जयानंद शिरोडकर (९०), केतकी संतोष रेडकर (९०) तर इयत्ता आठवी व नववीमधून चिन्मय युवराज मराठे (८८), चैताली सुनिल नवार (८२), श्रावणी अजय मुंज (७४) यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांचे संस्था उपाध्यक्ष ईर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सेक्रेटरी दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोझा तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page