नेत्रन धुरी उच्च शिक्षणासाठी युक्रेन येथे रवाना

‘सिंधू इंटरनॅशनल’चे सहकार्य

*⚡सावंतवाडी ता.०५-:* येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नेत्रन धुरी हे आपल्या पुढील उच्च शिक्षणासाठी युक्रेन येथे रवाना झाले आहेत. युक्रेनमधील शासकीय विद्यापीठाच्या खारकीव स्टेट झु वेटरनरी मेडिसिन अकॅडेमी येथे धुरी यांचे पुढील वैद्यकीय शिक्षण होणार आहे.

धुरी हे राणी पार्वतीदेवी कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. सुमेधा धुरी-नाईक व जायबा धुरी यांचे चिरंजीव असून त्यांना या वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण ॲडमिशन प्रक्रियेसाठी ‘सिंधू इंटरनॅशनल’ या संस्थेने मदत केली. यात एप्लिकेशन प्रोसिजर, एडमिशन लेटर इन्शुरन्स, व्हिसा प्रक्रिया, ट्रॅव्हल्स असिस्टंट, युक्रेन येथे रवाना झाल्यानंतर तेथील रिसिविंग प्रोसेस, युनिव्हर्सिटीच्या होस्टेलची संपूर्ण व्यवस्था, तसेच युक्रेनमधील विद्यापीठाच्या संपूर्ण ॲडमिशन प्रक्रिया सुरळीत पार पाडणे, संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत विविध प्रक्रियांची माहिती पुरविणे व त्या सोडविणे या सर्व बाबी सिंधू इंटरनॅशनलचे संचालक प्रा. डॉ. अजेय कामत यांनी पार पाडली आहे. त्याबद्दल पालकांच्यावतीने डॉ. सुमेधा धुरी यांनी प्रा. डॉ. कामत यांचे विशेष आभार मानले आहेत. नेत्रन धुरी आगामी काळात उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परतणार आहेत व येथे आल्यानंतर ते कर्मभूमीच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत असेही डॉ. धुरी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page