वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीच्या 4 जागांसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक 3 साठी 4 अर्ज, प्रभाग क्रमांक 5 साठी 4 अर्ज, तर प्रभाग 15 साठी 5 अर्ज, प्रभाग 16 साठी 6 अर्ज. असे एकूण 19 अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी मंगळवारी सकाळी 11 वा. पासून करण्यात येणार आहे. वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या शिल्लक राहीलेल्या 4 जागांसाठी 18 जानेवारीला निवडणूक होत आहे. ३ जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार व उमेदवारांचे समर्थक यांनी नगरपंचायत कार्यालयात गर्दी केली होती. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे – प्रभाग क्र. 3 – रेवा रामचंद्र बावधाणे ( भाजपा), रेश्मा तुकाराम बावधाणे ( भाजपा), सोनल संतोष मांजलकर ( शिवसेना), सुरेखा रमेश चव्हाण( राष्ट्रवादी ), प्रभाग क्र. 5 – संगीता बजरंग चव्हाण (भाजपा), उषा पंडीत चव्हाण ( भाजपा), सुनिता रविंद्र चव्हाण ( शिवसेना), सुवर्णा अशोक मोहीते ( काॕग्रेस), प्रभाग 15 – वैभव श्रीधर सावंत (शिवसेना), सिध्देश हरिश्चंद्र रावराणे ( शिवसेना), नारायण शांताराम मांजरेकर ( भाजपा), विलास श्रीपती मांजरेकर ( भाजपा), सुभाष अनाजी रावराणे ( अपक्ष ), प्रभाग क्र. 16 – रिया रणजीत तावडे ( अपक्ष), सुरेश वामन करकोटे( राष्ट्वादी), रणजीत हरिश्चंद्र तावडे (शिवसेना), दत्ताराम श्रीधर इंदप ( भाजपा), कल्पेश रत्नाकर कदम ( भाजपा), असे एकूण 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपकडून 8, शिवसेना 5, राष्ट्रवादी 2, काॕग्रेस 1, तर अपक्ष 3 असे अर्ज दाखल झाले आहेत. फोटो- निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा उमेदवार संगीता चव्हाण.
