सिंधुदुर्ग पोलिसांचे अचानक ऑल आऊट ऑपरेशन

वाहनांची सुरू आहे कसून तपासणी

*⚡ओरोस ता.०३-: जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाड़े यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी आज सायंकाळी अचानक ऑल आऊट ऑपरेशन सुरू केले आहे. या ऑल आऊटच्या माध्यमातून जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर येथील मार्गावर सुद्धा नाकाबंदी करण्यात आली आहे.

येथे पोलिसांचे एक पथक कार्यरत असून येणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेत आहे. वाहने तपासल्या शिवाय पुढे सोडली जात नाहीत. दोन महिन्यांपूर्वी सुद्धा अशाप्रकारे ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले होते. यावेळी हिस्ट्री शिटर गुन्हेगार, तपासकामी आवश्यक असलेले गुन्हेगार, संशयित यांचा शोध घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर हे ऑल आऊट मिशन राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

You cannot copy content of this page