क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेऊन महिलांसाठी कार्य करा

भाजपा शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांचे आवाहन

*⚡सावंतवाडी ता.०३-:* भारतीय स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणाऱ्या, भारतीय शिक्षणाचे गंगोत्री क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामूळेच आम्ही महिला आज समाजात प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहोत. त्यांनी समाजात असलेल्या बालविवाह, सतीप्रथा, केशवपन यासारख्या वाईट रूढी परंपरा बंद करण्यासाठी लढा दिला. त्यांचाच आदर्श समोर ठेऊन आपणही महिलांच्या व समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य कार्य करायला हवे, असे आवाहन भाजप सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केले. सावंतवाडी नगरपालिका सभागृहात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच ‘बालिका दिन ‘ च्या पार्श्वभूमीवर शाळेतील मुलींना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोड कर, भाजपा शहर मंडल सरचिटणीस मेघना साळगांवकर, अस्मिता भराडी, साक्षी गवस, अदिती दळवी, शुभदा सावंत, मिसबा शेख, ज्योती पटेल, वैभवी साळगांवकर आदी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन मेघना साळगांवकर यांनी तर आभार अस्मिता भराडी यांनी मानले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

You cannot copy content of this page