माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांचा स्तुत्य उपक्रम
*⚡सावंतवाडी ता.०३-:* क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांच्यावतीने आज शहरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
माजी नगरसेविका भालेकर सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांना मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्या समाजकार्यात कार्यरत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.