*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील ओसरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या इतिहासात पहिल्यांदाच लागलेल्या निवडणुकीत गाव पुरस्कृत श्री लिंगमाऊली पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी गटाच्या भाजपा पुरस्कृत पॅनेलला भोपळाही फोडता आलेला नाही. ओसरगाव सोसायटी निवडणुकीत 5 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.
उर्वरित 8 जागांसाठी गाव पुरस्कृत पक्षविरहित श्री लिंगमाऊली पॅनेल विरुद्ध भाजपा पुरस्कृत पॅनल यांच्यात लढत झाली. भाजपा पुरस्कृत पॅनल चे केवळ 5 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.आज झालेल्या मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत गाव पुरस्कृत श्री लिंगमाऊली पॅनेल चे 8 उमेदवार निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.धुळप यांनी काम पाहिले. विद्यमान चेअरमन श्री.प्रदीप तळेकर यांनी गाव पॅनलचे प्रचारप्रमुख म्हणून चोख काम बजावले. निवडीनंतर नूतन सर्व संचालकांचे गावाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.