*⚡कणकवली ता.०३-:* शाळकरी विद्यार्थिनीचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकल्याबद्दल त्या विद्यार्थिनीच्या एका नातेवाईकाने फोटो टाकणाऱ्या विद्यार्थ्याला चोप दिला. मात्र ही बाब त्या विद्यार्थ्यांच्या गावातील तरुणांना समजताच कणकवली शहरालगत असलेल्या त्या गावातील तरुणांनी एकत्र येत त्या तरुणाची पुरती धुलाई केली.दुपारी साडे अकराच्या दरम्यान महामार्गावर कणकवली शहरात घडला. दरम्यान या प्रकाराबाबत मिटवा मिटवी झाल्याने पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नव्हती. पण ज्याला चोप दिला त्याची मात्र कणकवलीत चर्चा होती.
शाळकरी मुलीचे फोटो काढणाऱ्याला दिला नातेवाईकांनी चोप
