Headlines

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत पिंगुळी येथे राष्ट्रीय पातळीवर रांगोळी स्पर्धेचे आयोजन

कणकवली 3 जानेवारी (प्रतिनिधी)- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय तर्फ़े तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंन्द्र नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी अध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या कला आंगण मध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. 8 जानेवारीला सकाळी 10 वा. होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या रांगोळी स्पर्धेसाठी वय वर्षे १० वरील व्यक्ति सहभागी होउ शकतील. या स्पर्धेसाठी आजादी का अमृत महोत्सव हा विषय असुन स्पर्धकांनी  ऑनलाईन नोंदणीसाठी चेतन परशुराम गंगावणे, पिंगुळी मोबाईल नं. 9987653909 या नंबरवर  नोंदणी करावयाची आहे. हि स्पर्धा जिल्हा पातळीवरील असुन केंद्र सरकारच्या वतिने या स्पर्धेचे आयोजन पिंगुळी येथे करण्यात आलेले आहे. सदरची स्पर्धा ऑनलाईन असुन स्पर्धकांना भव्य बक्षीस देण्यात येणार आहे. प्रथम नावे नोंदणी करणा-या व्यक्तींना यावेळी प्राधान्य देण्यात येईल. तसेच या रांगोळीचे प्रदर्शन शनिवारी सायंकाळी ४.०० ते ७.०० पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी संपर्क चेतन परशुराम गंगावणे, मो. नं. 9987653909, ठाकर आदिवासी कला आंगण, म्युझियम व आर्ट गॅलरी पिंगुळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page