सिंधुदुर्ग आईनबॉल असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी उमाकांत वारंग

सचिवपदी युवा नेते विशाल परब यांची नियुक्ती

*⚡सावंतवाडी ता.०३-: जिल्ह्यातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी प्राविण्य मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढावा, याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा आईनबॉल असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र आईनबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हा आईनबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष तथा क्रीडा, सहकार व सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे उमाकांत वारंग, तर सचिवपदी युवा उद्योजक तथा युवा नेते विशाल परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीचे पत्र महाराष्ट्र आईनबॉल असोसिएशनचे सचिव चंद्रकांत भदाणे यांनी पाठविले आहे. उमाकांत वारंग हे सावंतवाडी नगरपरिषदेचे सलग पाच वेळा नगरसेवक, एकदा स्वीकृत नगरसेवक तर एकदा उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. तसेच माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना वारंग यांनी त्यांचे पायलट म्हणून गाडी हाकली होती. वारंग हे क्रीडा सभापती असताना त्यांनी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना सावंतवाडीत पाचारण केले होते. भाजपाचे युवा नेते व उद्योजक विशाल परब यांनी अल्पावधीत अनेक विधायक उपक्रम राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रीडा व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. या दोन्ही व्यक्तींचे कार्य पाहून महाराष्ट्र आईनबॉल असोसिएशनने उमाकांत वारंग यांना अध्यक्षपद तर सचिवपद विशाल परब यांच्याकडे सोपविले आहे.

या निवडीबद्दल क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. जिल्ह्यातील खेळाडूंसाठी लवकरच आईनबॉल खेळाचे नियम व प्रशिक्षण शिबिर घेण्याचा मानस आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे कोच सावंतवाडीत आणले जातील आणि खेळाडूंना अत्यंत आवडणार्‍या खेळाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजन करण्यात येईल.!” – विशाल परब (सचिव) सिंधुदुर्ग जिल्हा हा क्रीडा क्षेत्रात अग्रेसर व्हावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आईनबॉल असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून लवकरच आईनबॉल खेळाचे विविध प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतील. त्यासाठी खेळाडूंची निवडही करण्याचे आयोजन करण्यात येणार आहे..!”

You cannot copy content of this page