*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथील शिवपुत्र असलदे क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत झेड.पी. फोंडाघाट संघाने विजेतेपद पटकावले तर कोळोशी उपविजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पारितोषिक 10,001 पंढरी वायंगणकर, द्वितीय क्रमांक पारितोषिक 7001/- संतोष कडू युवा मंच महाराष्ट्र राज्य , प्रमोद परब प्रथम व द्वितीय क्रमांक चषक , तसेच इतर आकर्षक चषक अँड प्रशांत तांबे,दिपेश तांबे, अनिल तांबे, भगवान लोके आदींचे सहकार्य लाभले आहे. वैयक्तिक आकर्षक पारितोषिक यामध्ये सामनावीर हे झेड पी फोंडाघाट संघाचा चेतन , उत्कृष्ट फलंदाज झेड पी फोंडाघाट संघाचा धनंजय,तर गोलंदाज कोळोशी संघातील कल्पेश भोवर यांना वैयक्तिक आकर्षक पारितोषिक देण्यात आली आहे.
पारितोषिक वितरणावेळी भाजपचे तालूका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर , सुभाष परब , सुभाष तांबे ,बाबू परब , स्वप्निल खडपे , सुरेश मेस्त्री, श्रीकृष्ण परब, संतोष घाडी , मधुसूदन परब, कमलाकर परब , महादेव परब ,उदय परब,आदी शिवपुत्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
