*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत हुंबरठ येथे सावित्रीबाई फुले जयंती सरपंच सौ. अर्चना वायंगणकर यांच्या हस्ते साजरी करण्यात आली. या प्रसंगी हुंबरठ ग्रामसेवक वैभव ठाकुर, कृषी सहाय्यक राहुल कोलवते, तसेच ग्रा प कर्मचारी सुनिल गुरव, समिर होळकर तसेच गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या विकासासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आज प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक आहे असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
