दोडामार्ग येथे पदाधिकारी भिडले, एकमेकांना दिला प्रसाद

घडलेल्या घटनेने जिल्हाभर चर्चेला उधाण

*⚡दोडामार्ग ता.०२प्रतिनिधी-:* दोडामार्ग तालुक्यात आज शेवटी धुमचक्री झालीच, काल फोनवरून एकमेकांना शिवीगाळ करून धमकी देणे ही घटना ताजी असतानाच रविवारी सायंकाळी साडेसहा च्या सुमारास दोन पदाधिकारी यांच्यात वाद चिघळला यावेळी काही पदाधिकारी यांनी मध्यस्थी करत वाद सोडविला पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबणारे नव्हते, यावेळी दोघांची पुन्हा वाटेत गाठ झाली,त्यातून त्यांनी एकमेकांवर हल्ला केला यात दोन्ही गटातील पदाधिकारी जखमी झाले आहेत.घटनेनंतर दोन्ही गटातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दोडामार्ग पोलिस स्थानकात धाव घेतली.

दोडामार्ग येथे वाद झाला हे समजताच पोलिस निरीक्षक आर जी नदाफ पोलिस स्थानकात तात्काळ दाखल झाले.सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या होत्या उशिरा पर्यंत दोडामार्ग पोलिस स्थानकात परस्पर फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू होती.

You cannot copy content of this page