मालवण शहरातील बंद स्ट्रीटलाईट अरविंद मोंडकर यांनी स्व: प्रयत्नातून केल्या सुरू

*⚡मालवण ता.०२-:* मालवण शहरातील अनेक रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट बंद असताना याबाबत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधुनही या लाईट सुरू करण्यात न आल्याने पूर्व इशाऱ्यावर युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी पुढाकार घेत आपल्या सहकाऱ्यांसमवेत शहरातील फोवकांडा पिंपळ ते टोपीवाला हायस्कुल व भरड ते म्हाडगुत घर दरम्यानच्या बंद स्ट्रीट लाईट सुरू करून घेतल्या.

मालवण शहरातील अनेक रस्त्यांवर लाईट बंद असतात त्यामुळे शहरातील नागरिकांना व शहरात येणाऱ्या पर्यटकांना देखील रस्त्यावरून ये- जा करताना त्रास होत असतो. याबाबत दोन महिन्यांपूर्वी मालवण युवक काँग्रेस तर्फे अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, पल्लवी तारी, सरदार ताजर व इतर पदाधिकारी यांनी मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. जिरगे यांना निवेदन देऊन रस्त्यावरील लाईट – पथदीप चालू करा अन्यथा नागरिकांच्या विनंती नुसार आम्ही स्वतः आमच्या प्रयत्नाने या लाईट चालू करून देऊ असा इशारा दिला होता. त्यावेळी एखादी कायदेशीर बाब निर्माण झाल्यास त्या परिणामाची जबाबदारी स्वतः नगरपरिषदेची असेल असे निवेदनात म्हटले होते.

मात्र याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्त्यांवरील बंद स्ट्रीट लाईटची अवस्था जैसे थे राहिल्याने नागरिकांच्या विनंतीवरून काल व आज युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी स्व: प्रयत्नांनी शहरातील फोवकांडा पिंपळ – टोपीवाला हायस्कूल दरम्यान व भरड – ते म्हाडगुत घर दरम्यान च्या पोलांवरील बंद असलेल्या लाईट सुरू करून घेतल्या. त्यामुळे तेथील नागरिकांनी मोंडकर यांचे आभार मानले. यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी देवानंद लुडबे, गणेश पाडगावकर, योगेश्वर कुरले आदि उपस्थित होते. शहरातील नागरिक घरपट्टी भरत असताना पथदीप कर देखील भरतात. नगरपरिषद हा पथदीप कर नागरिकांकडून घेत असतानाही रस्त्यांवरील लाईट काही ठिकाणी वर्षभर तर काही ठिकाणी गेले चार चार महिने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांन मध्ये नाराजी आहे. नागरिकांच्या विनंतीवरून आम्ही स्वतः त्याठीकाणी जाऊन लाईट लावून देणार आहोत, असे यावेळी अरविंद मोंडकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page