सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील हॉटेल व्यवसायिक हरेश दिनेश सातार्डेकर (५२, रा. जुना बाजार, मूळ रा.सातार्डा) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. शहरातील हॉटेल चंदूभवनमध्ये गेली कित्येक वर्षे त्यांनी मॅनेजर म्हणून काम पाहिले होते.
अलिकडेच काही वर्षात त्यांनी मोती तलावाच्या काठी स्वतः चा हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. सातार्डा येथील मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
