सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख सतीश सावंत यांचा टोला
*⚡कणकवली ता.२९-:* माजी आम.विजय सावंत यांच्या कारखान्याला विरोध करणाऱ्यासोबत आम्ही होतो.परंतु माझा कारखान्याला विरोध नव्हता.यामध्ये कोणीही कारखाना उभारू दे विजय सावंत वा राणे जरी ते करत असतील तर त्याला जिल्हा बँकेचे सहकार्य करेल. राणे यांना केवळ जिल्हा बँकेकडून घेतलेली कर्जे निर्लेखित करण्यासाठीच जिल्हा बँक हवी आहे मात्रजिल्ह्यातील मतदार कोणत्याही धनशक्तीला व आमिशाला बळी पडणार नाहीत.कारण ही बॅक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या घामातून उभी राहिली आहे.असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील महा विकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख सतीश सावंत यांनी केले
. कणकवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सतीश सावंत बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत,संदेश सावंत पटेल,नगरसेवक कन्हैया पारकर,अनुप वारंग,आदी उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले,जिल्ह्यात जी छोटी छोटी धरण पूर्ण झाल्यास साडे तीन ते चार लाख टन उसाचे उत्पादन झाले तर जवळ जवळ 200 ते 250 कोटींची उलाढाल या जिल्ह्यांमध्ये होवू शकेल.व्यवसाय वाढले तर निश्चित तर जिल्हा बँकेच्या मार्फत प्रयत्न केले जातील. स सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होत असून ही निवडणूक अत्यंत शांत वातावरणात पार पडेल प्रशासनाने तशा प्रकारची तयारी केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी मतदारांची भेट घेतली यावेळी सर्व मतदारांनी निर्भीडपणे मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला .कोणत्याही आमिषाला कोणत्याही दहशतीला सहकारी संस्था मतदार बळी पडणार नाही. गेल्या साडे सहा वर्षात जिल्ह्यात बँकेने जी कामगिरी केलेली आहे या कामगिरीची पोचपावती या निवडणुकीत निश्चितपणे आम्हाला मिळेल. हा जिल्हा भविष्यात आर्थिक समृद्ध होण्यासाठी फळप्रक्रिया शेतीपूरक त्याचप्रमाणे गोपुरीच्या माध्यमातून एक लाख लिटर दूध गोळा करण्यासाठी गाव तेथे दुग्ध संस्था स्थापन करण्याचा निर्धार जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे. सहकारी संस्था स्थापन होण्यासाठी वेगळा निधी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून उभा केला जाईल, त्याप्रमाणे शेती पूरक व्यवसाय यामध्ये भाजीपाला फळ प्रक्रिया, शेती ,दुग्ध ,मच्छी यासारख्या उद्योगांची उभारणी केली जाईल.गावामध्ये छोटे भात गिरणीधारक आहेत त्याचे सहकारी तत्वावर फेडरेशन केले जाईल.त्या दृष्टीने भात भरडाई करणाऱ्या गिरणी धारकांना गावागावात काम मिळेल.आणि या जिल्ह्यामध्ये 2007 मध्ये उसाचे जे 60 हजार टन उसाचे उत्पादन होते ते 2021 पर्यंत 1लाख 10 हजार टनांपर्यंत उत्पादन गेलेले आहे.यापूर्वीच्या काळात ऊस कारखान्याची केवळ चर्चा झाली.एकमेकांना राजकीय नेत्यांनी विरोध करण्याचे काम केले.पण या जिल्ह्याच्या भवितव्यच्या दृष्टीकोणातून या जिल्ह्यात साखर कारखाना होवू शकला नाही. भविष्यात जिल्हा बॅकेच्या माध्यमातून येथील लोकांना एकत्रित करून येणाऱ्या 5 वर्षांत साखर व इथेनॉल निर्मितीचा कारखाना कसा पद्धतीने होईल याबाबतचे नियोजन बँकेकडून केले जाईल.जे लोक एकत्र येतील त्या संस्थेला पत पुरवठा केला जाईल.तसेच या त्यामुळे या घामाचे मोल आणि कष्टाचे मोल या सहकारी संस्थांना आहे त्याचे प्रतिबिंब उद्याच्या निवडणुकीत दिसेल.जे मतदार बेपत्ता किंवा गायब झालेले आहेत त्या बाबत त्यांच्या बंधूनी तक्रार केली आहे.त्याचा शोध पोलिस घेत आहेत.गायब झालेला मतदार उद्या आला तर त्यांचा पोलीस जबाब घेतील कोणी बेपत्ता केले ?कुठे नेवून ठेवलेयाचा खुलासा होईल. माजी आम.विजय सावंत यांच्या कारखान्याला विरोध करणाऱ्यासोबत आम्ही होतो.परंतु माझा कारखान्याला विरोध नव्हता.यामध्ये कोणीही कारखाना उभारू दे. विजय सावंत वा राणे जरी ते करत असतील तर त्याला जिल्हा बँकेचे सहकार्य करेल.त्यामुळे यामधून जिल्ह्यातील लोकांना रोजगार मिळेल शेतकऱ्यांना रोजगार मिळणार आहे.त्यामुळे कारखाना कोण करतोय यापेक्षा कारखाना झाला पाहिजे हे माझे मत आहे.यामुळे कोणत्या पक्षाचा कारखाना होणार नाही येथील जनतेचा तो कारखाना होईल.म्हणून जनतेच्या कारखान्याला आमचा पाठिंबा राहील.राणेंना बजावलेली नोटीस हा प्रशासनाचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच कारवाई होईल.त्याबाबत आपण काही बोलणार असे त्यांनी सांगितले.
