*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे बुधवार 29 डिसेंबर व गुरुवार दि. 30 डिसेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 29 डिसेंबर 2021 रोजी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व राखीव. गुरुवार दि. 30 डिसेंबर 2021 सकाळी 9 ते 12.30 वा पर्यंत वेंगुर्ला येथे राखीव. दुपारी 12.30 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपीकडे प्रयाण, दुपारी 1 वा. सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वा. सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथून एअर इंडिया विमानाने मुंबईकडे प्रयाण.
