*💫सावंतवाडी दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याला अडचणीत आणण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन प्रसंगी बोलताना केला आहे. नगराध्यक्ष संजू परब यांच्या एका वर्षाच्या कालावधीत अनेक अडचणीचा सामना त्यांना करावा लागला असून, या सर्व अडचणींवर त्यानी यशस्वी पणे मात करत विकास कामे पूर्ण केली आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी अशा शब्दात नगराध्यक्ष संजू परब यांचे कौतुक माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. परब यांच्या मध्ये काम करण्याची धडपड असल्याचे ही ते यावेळी म्हणाले आहेत. कोरोना सारख्या काळात प्रशासनातील पैसे शोधून आणत पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे जनतेने लोकांसाठी काम करणारी माणस ओळखून त्यांना निवडून द्यावे ,त्यामुळे विकास होईल अस मत यावेळी व्यक्त केले आहे.
जिल्ह्याला ठाकरे सरकारने अडचणीत आणण्याचे केले काम – माजी खा. निलेश राणे
