*तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याजवळ दिला राजीनामा
*💫सावंतवाडी दि.३०-:* मळगावचे शिवसेना विभागप्रमुख रामचंद्र सदाशिव देवळी यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याजवळ दिला आहे. यात त्यांनी म्हटले की, आपण गेली ६ वर्षे सामाजिक कार्यात कार्यरत आहे. गाव हाच आपल्यासाठी पक्ष असे समजून सामाजिक कार्य करत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी गावच्या विकासासाठी आपण आपल्या मित्रमंडळींसमवेत शिवसेना खासदार तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या समक्ष शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. परंतु आपल्याला दिलेली आश्वासने खोटी ठरल्याने यापुढे आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून गावासाठी कार्यरत राहणार आहे. पक्षात कुवत नसलेल्यांच्या हातात जबाबदारी आणि आमच्या हातात करवंटी अशी पध्दत असल्यामुळे विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे
