पळसंब येथे महिला बचतगटांना मार्गदर्शन

*⚡मालवण ता.२४-:* पळसंब येथील समाज मंदिर येथे भगीरथ विकास प्रतिष्ठान, नाबार्ड, जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पळसंब मधील महिला बचत गटांना नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच चंद्रकांत गोलतकर, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, जिल्हा बँक शाखाधिकारी किशोर गोवेकर, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक अजय थुटे, बचतगट प्रमुख मृणाली पुजारे, ग्रा. पं. सदस्या सीमा चव्हाण तसेच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page