क्षत्रिय घाडीगांवकर सेवा समाज पदाधिकारयांची चिंदर माऊली मंदिराला भेट…

*⚡मालवण ता.२४-:* चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर क्षत्रिय घाडीगांवकर सेवा समाजाच्या पदाधिकारी यांनी भेट देवून येथील समाज बांधवांना समाज ऐक्यासाठी आवाहन केले.

यावेळी श्री देवी भगवती माऊली सेवा समितीचे कार्याध्यक्ष केशव घाडी यांनी सर्व पदाधिकारी यांचे देवीची प्रतिमा आणि श्रीफळ देवून स्वागत केले.यावेळी मध्य मुंबई अध्यक्ष सदानंद घाडी, सिंधुदुर्ग अध्यक्ष सुर्यकांत घाडी, विजय गांवकर, रमेश चिंदरकर, लक्ष्मण घाडीगांवकर, प्रदिप घाडी, बुधाजी घाडीगांवकर, अर्जुन बापर्डेकर, प्रदिप रामा घाडीगांवकर, सुर्यकांत शिर्डेकर यांसह चिंदर श्री देवी भगवती सेवा समितीचे मनोहर घाडी, अरविंद घाडी, सुनील घाडी,धाकू घाडी, अशोक घाडी,अनिल घाडी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page