*⚡कणकवली ता.२४-:* बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग संचलित बॅ. नाथ पै बी. एड्. काॅलेज अंतर्गत सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम परीक्षा सन २०२१ चा निकाल नुकताच जाहीर झाला.
यामध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी यांनी अंतिम परीक्षेत ९७ ३७ टक्के प्राप्त करून विशेष प्राविण्यासह महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त करून देदीप्यमान यश संपादन केले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन एल्. डी. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी यांचे अभिनंदन केले.
