भागीरथी भोईर प्रतिष्ठान कडून राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण…

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देण्यात आले पुरस्कार

देवगड -:भागीरथी भोईर प्रतिष्ठान पालघर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला.यात जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले देवगड,पत्रकार प्रशांत वाडेकर पोलीस कॉन्टेबल फकरूद्दीन आगा मुख्याध्यापक संजीव राऊत याना गौरविण्यात आले. ग्रामीण युवा उद्योजकता प्रशिक्षण केंद्र,भागीरथी भोईर प्रतिष्ठान यांच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण वर्गाचे आयोजन देवगड येथील स्नेहसंवर्धक सभागृह देवगड येथे करण्यात आले होते.या शिबिरात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी उत्सवमूर्ती समवेत भागीरथी भोईर प्रतिष्ठान अध्यक्ष दिनेश भोईर,सौ दीक्षा भोईर,नगरसेविका श्रुती जाधव,देवगड अध्यक्ष गौतमी कदम,ग्रामीण युवा उद्योजकता चे अधिकारी एस.टी सोनावले,श्री बनसोडे,श्री बांदकर,श्री तेली, रविना भाबल उपस्थित होते. या सोहळ्यात उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार दयानंद मांगले, प्रशांत वाडेकर,सामाजीक कार्य पुरस्कार पोलीस कॉन्स्टेबल फकरुद्दीन आगा,एस.टी सोनावले (सोलापूर ) शैक्षणिक कार्य पुरस्कार मुख्याध्यापक संजीव राऊत,याना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र शाल,गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.या निमिताने युवा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आला . या वेळी पत्रकार दयानंद मांगले,प्रशांत वाडेकर,श्री सोनावले,अध्यक्ष दिनेश भोईर यांनी आपले विचार मांडले.

You cannot copy content of this page