जिल्हा वारकरी मेळाव्याला उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना.उदय सामंत उपस्थित राहणार

*⚡कणकवली ता.२३-:* सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा अकरावा वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा रविवार २६ डिसेंबर २०२१ ओरोस रवळनाथ मंदिर येथे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, पालकमंत्री ना.उदय सामंत खा.विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून यावेळी आ.दीपक केसरकर, आ.वैभव नाईक, आ.नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हेही उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वा. वारकरी दिंडीने होणार असून हरिनामाच्या गजरात दिंडी श्री.भवानी मंदिर, सावंतवाडा ओरोस येथून निघून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रवळनाथ मंदिर येथे येईल त्यानंतर हरिपाठ होईल व मेळाव्याला सुरुवात होईल. दुपारी १२ वा मान्यवरांच्या हस्ते संतसेवा प्रवचन मालिका प्रकाशन,दिनदर्शिका प्रकाशन व संतसेवा पुरस्कार* प्रदान सोहळा संपन्न होणार आहे व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. तरी जिल्ह्यातील सर्व वारकरी व पांडुरंग भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग सचिव राजू राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page