कणकवली तालुका पत्रकार समितीचा आदर्शवत उपक्रम
*⚡कणकवली ता.२३-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालय परिसरातील स्वच्छता मोहिम गुरूवारी राबविण्यात आली . कणकवली तालुका पत्रकार समिती सदस्य , तहसीलदार आर. जे. पवार व तहसील कर्मचारी तसेच नगरसेविका मेघा गांगण यांनीही यात सहभागी होत सहकार्य केले .
सुमारे अडीज तास राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत तहसीलदार कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली . कणकवली तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्यानुसार गुरूवारी सकाळी ८ वा . पासून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली . यावेळी तहसीलदार आर . जे . पवार , पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे , नगरसेविका मेघा गांगण , जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे , तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई , तालुका सचिव संजय राणे , खजिनदार नितीन कदम , ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर , अशोक करंबेळेकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे , माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत भावे , भगवान लोके , संतोष राऊळ , मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील , तलाठी सुवर्णा कडूलकर , कर्मचारी रमेश कांबळे , रणजित चौगुले , महादेव बाबर , मनोज आव्हाड , राजेश चौगुले , बापू जाधव , तसेच बंडू गांगण , सुशिल पारकर , प्रसाद अंधारी , पत्रकार समितीचे संजोग सावंत , तुषार सावंत , भालचंद्र साटम , भास्कर रासम , दिलीप हिंदळेकर , गुरुप्रसाद सावंत , संजय पेटकर , विरेंद्र चिंदरकर , सचिन राणे , हेमंत वारंग , मिलींद पारकर , नंदादीप सावंत , विराज गोसावी , उमेश बुचडे , अनिकेत उचले , तुषार हजारे , दिलीप जाधव , प्रदीप राणे , चंद्रशेखर तांबट , संजय बाणे , संतोष जोगळे , विवेक ताम्हणकर , शशिकांत सातोसे व इतर सहभागी झाले होते . आर . जे पवार म्हणाले , ज्यावेळी परिसर स्वच्छ असतो , त्यावेळी कामाचा हुरूप येतो .
अशाच प्रकारचे विधायक काम पत्रकारांच्या माध्यमातून होत आहे . शासकीय निधीवर अवलंबून न राहता अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविण्याचा आमचाही प्रयत्न राहिल . अशा उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्यही राहिल . सौ . गांगण म्हणाल्या , सामाजिक बांधीलकीतून समाजाच्या हिताचे उपक्रम राबविले जातात . याचे उदाहरण पत्रकार बांधवांनी दिले असून परिसर स्वच्छतेसाठी पत्रकारांच्या या उपक्रमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन भविष्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून असे उपक्रम राबविले जातील . तसेच यासाठी नगरपंचायतीचे सर्व सहकार्य राहिल . गणेश जेठे म्हणाले , तालुका पत्रकार समितीचा हा उपक्रम इतरांनी आदर्श घ्यावा , असाच आहे . या उपक्रमाचे आम्ही कौतुक करतानाच इतरांनीही याचा आदर्श घ्यावा , असे आवाहन त्यांनी केले . तर या उपक्रमात सहभागी झालेल्या तहसीलदार आर . जे . पवार , मेघा गांगण , नगरपंचायत कर्मचारी , तहसील कर्मचारी , पत्रकार संघाचे सदस्य यांचे तसेच सहकार्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांची आभार तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी मानले .
