दोडामार्ग मध्ये उर्वरित चार प्रभागात दोन सर्वसाधारण महिला तर दोन सर्वसाधारण आरक्षण…

*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग येथील नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी आज आरक्षण सोडत पार पडली असून, यामध्ये प्रभाग चार व आठ सर्वसाधारण महिला, तर प्रभाग एक व दहा सर्वसाधारण,असे आरक्षण जाहीर झाले आहे.

उपविभागीय अधिकारी प्रशांत पनवेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली असून यावेळी तहसिलदार अरुण खानोलकर, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, निवडणूक नायब तहसिलदार सत्यवान गवस, तसेच उमेदवार उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्टी काढून सोडतीचा हा निकाल जाहीर करण्यात आला.

You cannot copy content of this page