नगराध्यक्ष पदावरून पायउतार होताना संजू परब यांनी व्यक्त केला विश्वास…
*⚡सावंतवाडी ता.२२-:* मी ज्या दिवशी नगराध्यक्ष पदावर बसलो, त्या दिवशी देखील नगरपालिकेच्या सभागृहात गर्दी होती. आणि आज पदावरून पायउतार होताना देखील गर्दी आहे. याचाच अर्थ सावंतवाडीतील जनतेला जो अपेक्षित विकास हवा होता. तो मी निश्चितच केला आहे. परंतु, आज जरी या पालिकेत माझ्या नगराध्यक्ष पदाचा शेवटचा दिवस असला तरी मी सत्तेसह “पुन्हा येईन… पुन्हा येईन…” असा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी सत्कार समारंभावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
