हडी ज्येष्ठ नागरिक संघ वर्धापन दिन २६ रोजी

*⚡मालवण ता.२२-:* मालवण तालुक्यातील हडी येथील फेस्कॉम संलग्नग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा वर्धापन दिन २६ डिसेंबर रोजी विविध उपक्रमांनी हडी जठारवाडी शाळा येथे सकाळी ९ ते २.३० या वेळेत साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय हेल्पलाईन प्रतिनिधी प्रथमेश सावंत, कांदळगाव सरपंच उमदी परब, विवेकानंद नेत्रालयाचे संदीप कदम उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० ते १० दीप प्रज्वलन, मान्यवरांचे सत्कार, १०.३० ते १२.३० मोफत नेत्र चिकित्सा शिबीर, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत.

You cannot copy content of this page